बीड - पं. दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण वर्ग महाभियान २०२६ चा शुभारंभ संपन्न
बीड, 14 एप्रिल, (हिं.स.)। अंबाजोगाई येथे उत्साहपूर्ण वातावरणात आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड सहभागत दोन दिवसीय “पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण वर्ग महाभियान २०२६” चा शुभारंभ संपन्न झाला. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उप
अ


बीड, 14 एप्रिल, (हिं.स.)। अंबाजोगाई येथे उत्साहपूर्ण वातावरणात आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड सहभागत दोन दिवसीय “पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण वर्ग महाभियान २०२६” चा शुभारंभ संपन्न झाला.

या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा आणि संघटन बळकटीकरण याबाबत मार्गदर्शन मिळाले. पन्नगेश्वर शुगर मिल्स चे चेअरमन तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अक्षय मुंदडा यांनी कार्यकर्त्यांना संघटन अधिक सक्षम करण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत आगामी काळात अधिक जोमाने काम करून स्थानिक पातळीवर पक्ष बळकट करण्याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास भाजपा प्रवक्ते श्री. रामभाऊ कुलकर्णी, मंडळ अध्यक्ष श्री. गोकुळ नाना कदम, श्री. संजयजी गंभीरे तसेच अंबाजोगाई ग्रामीण व शहर मंडळातील सर्व पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्तिकेंद्रप्रमुख आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

यानंतर गणेशजी लांडे यांनी “मन की बात” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन करत जनसंवादाचे महत्त्व, नागरिकांशी थेट संवाद साधण्याची गरज आणि विचारांची प्रभावी मांडणी कशी करावी यासंदर्भात मार्गदर्शन केले.

रामदास बडे यांनी “बूथ व्यवस्थापन” या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. यामध्ये बूथ स्तरावरील संघटन अधिक सक्षम, सक्रिय आणि परिणामकारक कसे करता येईल यासंदर्भात मार्गदर्शन केले. एकूणच, प्रशिक्षण, प्रभावी संवाद आणि संघटन बळकटीकरणाचा त्रिवेणी संगम ठरलेला हा उपक्रम कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि सकारात्मक परिणाम करणारा ठरला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande