नाशिकमध्ये बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
Babasaheb Ambedkar Jayanti in full swing
Babasaheb Ambedkar Jayanti


Babasaheb Ambedkar Jayanti


नाशिक, 14 एप्रिल, (हिं. स) नाशिक महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व मनपा मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. शिवाजी रोड,शालिमार येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास मनपाच्या वतीने महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे,गटनेते शाम बडोदे, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड आदींसह पदाधिकारी अधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. यावेळी कार्यक्रमास पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे,साहेबराव भोसले,जयश्री गांगुर्डे,मनोज खैरनार आदींसह मनपा कर्मचारी उपस्थित होते. मनपा मुख्यालय आंबेडकर जयंती साजरी मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,नगरसेवक सुरेश पाटील यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, सुवर्णा दखणे,घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.आवेश पलोड,सहाय्यक आयुक्त रमेश बहिरम,सुरक्षा अधिकारी रमेश ताजनपुरे,नगरसचिव संजय नेरकर, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे,महेंद्र केंदळे,मनीषा पाटेकर,साहेबराव भोसले,मिलिंद राजगुरू ,जयश्री गांगुर्डे,संतोष वाघ ,गुणवंत वाघ, मनोज खैरनार,नामदेव वाघमारे वसंत घोडेराव,संजय गायकवाड किशोर जाधव,स्वप्निल निकम जयश्री सोनवणे,योगिता वाघ,विशाल घागरे, मयूर चराटे, अरुण साळवे मोसमी जाधव, वाल्मीक भंदुरे आदींसह मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande