नांदेड - शेतकऱ्यांचा तीन टप्प्यात विकास करणे शक्य : गुणवंत पाटील
नांदेड, 14 एप्रिल, (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना अंतर्गत थकीत असलेल्या पीक कर्जावर दोन लाख रुपये पर्यंत माफी देण्यात आली होती. तसेच कर्जाची रक्कम नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यास 50 हजार रुपयाचे प्रोत्साहन अनुद
नांदेड - शेतकऱ्यांचा तीन टप्प्यात विकास करणे शक्य : गुणवंत पाटील


नांदेड, 14 एप्रिल, (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना अंतर्गत थकीत असलेल्या पीक कर्जावर दोन लाख रुपये पर्यंत माफी देण्यात आली होती. तसेच कर्जाची रक्कम नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यास 50 हजार रुपयाचे प्रोत्साहन अनुदान देणार आहेत. परंतु या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया पूर्णत्वास गेली नाही. त्यामुळे आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे ही शेतकऱ्यांची स्थिती टाळण्यासाठी शेतकऱ्यांचा तीन टप्प्यात विकास करणे शक्य आहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते गुणवंत पाटील यांनी केले आहे.

संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात चिंचोली लिंबाजी गावात कर्जबाजारीपणामुळे 35 वर्षाचा तरुण शेतकरी दीपक किसन गांगोडे यांनी केलेल्या आत्महत्या संदर्भात बोलत असताना एप्रिल कार्यकर्त्यांना संबोधित करताना शेतकरी संघटनेचे नेते गुणवंत पाटील यांनी शेतकऱ्यांचा तीन टप्प्यात विकास होणे शक्य असल्याचे प्रतिपादन केले. 1) शासनाने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. शेतकऱ्यांवर सुलतानी आणि आसमानी संकटाचा सतत मारा होत आहे. त्यामुळे शेतकरी

आर्थिक व सामाजिक दृष्ट्या संकटात सापडला आहे. म्हणून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होणे गरजेचे आहे. 2) शेतकऱ्यांनी परंपरागत पद्धतीने शेती न करता तांत्रिक पद्धतीने शेती करावी. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. 3) शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठ विकसित करावी आणि स्वामीनाथन यांच्या अहवालानुसार शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चानुसार भाव द्यावा. असे त्यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी तीन टप्पे सांगितले. ज्याप्रमाणे वामनाने बळीराजाकडून तीन टप्प्यात सगळे राज्य बळकावले, त्याचप्रमाणे बळीराजा शेतकऱ्याला या तीन टप्प्यात त्यांची आर्थिक संपन्नता बहाल करता येईल असे पुरोगामी विचारवंत व शेतकरी संघटनेचे नेते गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी आपले मत व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande