
बीड, 14 एप्रिल, (हिं.स.)। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरातील त्यांच्या स्मृतिस्थळास जिल्हाधिकारी बीड यांनी पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे महान पुरस्कर्ते आणि समतेच्या लढ्याचे अग्रदूत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संविधानाचा भक्कम पाया आजही देशाला दिशा देणारा आहे. समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मूल्यांची जपणूक करण्याची प्रेरणा त्यांच्या विचारांमधून प्रत्येकाला मिळत राहते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis