
छत्रपती संभाजीनगर, 14 एप्रिल (हिं.स.)। स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या युवक- युवती, महिलांसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने एक महिना कालावधीचे उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती १५ एप्रिल २०२६ पासून करण्यात आले आहे. या प्रशिक्षक कार्यक्रमात विविध उद्योगसंधी बाबत मार्गदर्शन, बाजारपेठ पाहणी, उद्योग निवड, तंत्र उद्योगासाठी विविध शासकीय सोयी सवलती, प्रकल्प अहवाल तयार करणे, व्यक्तिमत्व विकास, उद्योग घटकांना भेटी, व्यवसायास लागणारे परवाने इत्यादी बाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले जाणार आहे.
या संधीचा युवक- युवती, महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन सुदाम थोटे विभागीय अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे .अधिक माहितीसाठी आशा कुरवाडे ७८८८०७०४१९ कार्यक्रम समन्वयक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र A ३८ एमआयडीसी परिसर रेल्वे स्टेशन रोड येथे संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis