लातूर - चाकुरात विराट हिंदू संमेलन उत्साहात
लातूर, 14 एप्रिल (हिं.स.)। चाकूर शहरातील जगत जागृती विद्या मंदिराच्या प्रांगणात विराट हिंदू संमेलन उत्साहात पार पडले. संमेलनाच्या ठिकाणी भगव्या वातावरणाची छटा पाहायला मिळाली असून, तालुक्यातील विविध भागांतून महिला, तरुण आणि नागरिकांनी उपस्थिती दर्श
विराट हिंदू संमेलन


लातूर, 14 एप्रिल (हिं.स.)।

चाकूर शहरातील जगत जागृती विद्या मंदिराच्या प्रांगणात विराट हिंदू संमेलन उत्साहात पार पडले. संमेलनाच्या ठिकाणी भगव्या वातावरणाची छटा पाहायला मिळाली असून, तालुक्यातील विविध भागांतून महिला, तरुण आणि नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. अध्यक्षस्थानी डॉ. चंद्रप्रकाश नागिमे हे होते प्रमुख वक्ते म्हणून देवगिरी प्रांत संपर्कप्रमुख इंद्रजीतसिंह बैस हे उपस्थित होते. श्री १००८ सगुरु शंकरलिंग शिवाचार्य महाराज शिरूर अनंतपाळकर व ह.भ.प. भागवताचार्य अनंत महाराज बेलगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

प्रमुख वक्ते इंद्रजीतसिंह वैस यांनी आपल्या भाषणात भारताला पुन्हा 'विश्वगुरू' बनवायचे असेल तर प्रत्येक कुटुंबाने मुलांना छत्रपती शिवाजी महाराज व प्रभू श्रीराम यांच्या कार्याची ओळख करून देणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रत्येक घरात 'जिजाऊ' सारखी संस्कारक्षम माता घडणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. देशहितासाठी स्वदेशी वस्तूंचा वापर वाढविण्याचे आवाहनही त्यांनी केले. ह.भ.प. भागवताचार्य अनंत महाराज बेलगावकर यांनी आपल्या भाषणातून मातृभूमीप्रेम, संस्कार आणि धर्माभिमान यांचे महत्त्व स्पष्ट केले. 'जन्म देणारी आई आणि जन्मभूमी सर्वश्रेष्ठ' ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे, असे सांगताना त्यांनी तरुण पिढीवर विशेष भर दिला. आजची तरुणाई व्यसनांच्या विळख्यात अडकत असल्याची खंत व्यक्त करीत, त्यांना योग्य संस्कार देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मुलांना दररोज आई-वडिलांचे दर्शन घेण्याची सवय लावणे, धर्मग्रंथांचे वाचन करण्यास प्रवृत्त करणे आणि गीता, ज्ञानेश्वरी यांसारख्या ग्रंथांचा अभ्यास घडवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्र स्वच्छ व सशक्त बनविण्यासाठी नद्यांचे संवर्धन, तसेच मतदानाचा अधिकार योग्य पद्धतीने वापरण्याचेही आवाहन त्यांनी केले.

श्री शंकरलिंग शिवाचार्य महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात शिक्षण घेताना योग्य मित्रपरिवाराची निवड करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे सामाजिक एकात्मता वाढेल आणि विविध समस्यांवर नियंत्रण मिळवता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षीय समारोपात डॉ. चंद्रप्रकाश नागिमे यांनी 'एक रहोगे तो सेफ रहोगे' हा संदेश देत एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले. चाकूर येथील वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. ज्ञानेश्वर कापसे व उदगीर येथील गोरक्षकांची हत्या झाली आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली व पसायदानाने हिंदू संमेलनाची सांगता झाली.

---------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande