धुळ्यात जिवंत प्राण्यांची तस्करी; विविध प्राणी, पक्षी ताब्यात
धुळे, 14 एप्रिल (हिं.स.)मालेगाव ते गुजरात राज्यात धुळे-सुरत महामार्गाने एका लाल रंगाचे वाहन क्रमांक MH.41 AU. 2352 यामधुन प्रतिबंधीत असलेले वन्यजीव प्राण्यांची व पशुपक्षांची वाहतुक होणार असुन सदर वाहन हे विसरवाडी हद्दीतुन जाणार आहे, बाबत खात्रीशीर
धुळ्यात जिवंत प्राण्यांची तस्करी; विविध प्राणी, पक्षी ताब्यात


धुळे, 14 एप्रिल (हिं.स.)मालेगाव ते गुजरात राज्यात धुळे-सुरत महामार्गाने एका लाल रंगाचे वाहन क्रमांक MH.41 AU. 2352 यामधुन प्रतिबंधीत असलेले वन्यजीव प्राण्यांची व पशुपक्षांची वाहतुक होणार असुन सदर वाहन हे विसरवाडी हद्दीतुन जाणार आहे, बाबत खात्रीशीर माहिती मिळाली. त्याअन्वये जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी लागलीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास कारवाई कामी रवाना केले.

मिळालेल्या गोपनिय माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील बर्डीपाडा टोलनाका येथे नाकाबंदी करीत असतांना रात्रीचे सुमारास एक संशयित चारचाकी आयशर वाहन थांबवुन तपासणी केली असता सदर वाहनामध्ये भाजीपाला कॅरेटच्या आड प्राणी व पक्षी असल्याचे मिळुन आले.

सदर वाहनातील चालक व इतर दोन इसमांना पथकाने ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे 1. शहजाद अहमद अतिक अहमद, वय- 47 वर्षे, रा. अब्दुल नगर मालेगाव, जि.नाशिक 2. मोमीन मोहम्मद मोईन समसुल हक, वय 32 वर्षे, रा. पज्तन चौक, मालेगाव, जि.नाशिक 3. शेख सोहेल शेख अफजल कुरेशी, वय- 24 वर्षे, रा.गुलाब पार्क, मालेगाव, जि. नाशिक असे सांगितले. त्यांना विश्वासात घेऊन विचारपुस करता त्यांनी सांगितले की, त्यांना मालेगाव येथील काही व्यक्तींनी वन्यजीव प्राणी व पक्षी गुजरात राज्यातील वडोदरा येथे वाहतुक करण्यासाठी दिले होते. सदर कारवाईत वाहनातुन 05 कोल्हा जातीचे प्राणी, 99 हिरव्या रंगाचे लाल चोच असलेले जातीचे पोपट व 190 तितर जातीचे पक्षी सह वाहन असा एकुण 23,40,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला असुन वन्य प्राण्यांना सुस्थितीत वनविभागाचे ताब्यात देऊन वर नमुद आरोपींवर विसरवाडी पोलीस ठाणे येथे वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande