कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
कोल्हापूर, 14 एप्रिल (हिं.स.)। महामानव, परमपूज्य, भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती दिनानिमित्त बिंदू चौकातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अभिवादन केले. ऐतिहासिक माणगाव परिषद झ
जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


कोल्हापूर, 14 एप्रिल (हिं.स.)। महामानव, परमपूज्य, भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती दिनानिमित्त बिंदू चौकातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अभिवादन केले. ऐतिहासिक माणगाव परिषद झालेल्या हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील डॉ .बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या ठिकाणी माजी आमदार डॉ सुजित मिणचेकर, राजीव आवळे यांच्यासह हजारो जणांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. जिल्ह्यातील विविध संस्था, शासकीय कार्यालयात आणि डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले तसेच विविध संघटना, तरुण ममंडळे, समाजाच्यावतीने सामाजिक उपक्रम राबवून आणि भव्य मिरवणूक काढून डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.

बिंदू चौकात आमदार जयंत आसगावकर,महापौर रूपाराणी निकम,मनपा आयुक्त डॉ राजेंद्र भारूड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मिन,अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव,उपायुक्त परितोष कंकाळ,उप महापौर अक्षय जरग,श्री साळे आदी उपस्थित होते .

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांमुळे भारतीय समाजाला नवी दिशा मिळाली .त्यांनी लोकशाहीची पायाभरणी अधिक मजबूत केली.समाज परिवर्तनासाठी महापुरुषांनी दिलेल्या विचारांचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करणे सध्या काळाची गरज आहे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे समाजात समानतेची आणि न्यायाची भक्कम पायाभरणी झाली. माणसाला माणूस म्हणून सन्मानाने जगता यावे तसेच अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांनी तत्कालीन समाजाला दिली आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वाभिमानाची जाणीव निर्माण केली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचे योगदान विसरता येणार नसल्याचे महापौर रूपाराणी निकम म्हणाल्या.

याप्रसंगी माजी खासदार प्रा.संजय मंडलिक यांनीही समयोचीत विचार व्यक्त केले. प्रारंभी पोलीस बॅण्ड पथकाने आपले सादरीकरण केले. तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वस्तीगृहातील मुलींनी जागर संविधानाचा हे पथनाट्य सादर केले तसेच यावेळी प्रतिकात्मक स्वरूपात काही विद्यार्थांना पालकमंत्र्यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आल्या.

याप्रसंगी माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, राजीव आवळे,वसंतराव मुळीक ,विजय देवणे, कादर मलबारी,राजेश लाटकर, डी.जी भास्कर यांच्यासह इतर हजारो भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी झाली. बँकेच्या संचालिका सौ. श्रुतिका काटकर व सौ. स्मिता गवळी, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे यांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे, सर्व व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, कमर्शियल बँकेचे संचालक युवराज गवळी, ॲड. शाहू काटकर तसेच; केंद्र कार्यालय व कोल्हापूर शहरातील सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर प्रेस क्लब कोल्हापूर येथे अभिवादन करण्यात आले.तसेच भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.

यावेळी जेष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी,विजय पोवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तर न्युज १८ चे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले. यावेळी कोल्हापूर प्रेस क्लब कोल्हापूर चे अध्यक्ष शीतल धनवडे,उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर,सतेज औंधकर,संदिप पाटील,सचीन सावंत,दुर्वा दळवी,श्रीकांत पाटील,सुरज पाटील,प्रकाश देवणे आदी पत्रकार, कॅमेरामन उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande