
बीड, 14 एप्रिल (हिं.स.)।महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या मुंबई क्षेत्रातील लघुलेखक पदांच्या भरतीला चार वर्षांहून अधिक काळ लोटल्याने परीक्षार्थींमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. बीड जिल्ह्यातील परीक्षार्थी हतबल झाले आहेत. २०१९ नंतर नियमितपणे २०२५ मध्ये अपेक्षित असलेली जाहिरात मार्च २०२६ संपले तरी प्रसिद्ध न झाल्याने हजारो तरुणांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपत चालली असून, रात्रंदिवस परिश्रम करूनही नोकरीची संधी मिळत नसल्याने हतबलता व्यक्त केली जात आहे. ३० पेक्षा अधिक आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊनही प्रशासकीय स्तरावर अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. शासनाने तात्काळ नवीन जाहिरात प्रसिद्ध न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उमेदवार व इतर सुशिक्षित बेरोजगार युवकांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis