जळगावात मधमाशांच्या हल्ल्यात 12 शेतमजूर जखमी
जळगाव , 14 एप्रिल (हिं.स.)जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात वाणेगाव शिवारात मधमाशांनी शेतमजुरांवर अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात १२ शेतमजूर जखमी झाले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. पाचोरा तालुक्यातील वाणेगाव श
जळगावात मधमाशांच्या हल्ल्यात 12 शेतमजूर जखमी


जळगाव , 14 एप्रिल (हिं.स.)जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात वाणेगाव शिवारात मधमाशांनी शेतमजुरांवर अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात १२ शेतमजूर जखमी झाले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. पाचोरा तालुक्यातील वाणेगाव शिवारात शेतमजूर नियमितप्रमाणे शेतात काम करत होते. यावेळी झाडावर असलेले मधमाशांचे पोळ अचानक उठल्याने मधमाशांनी थेट शेतमजुरांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शेतमजूर घाबरून सैरावैरा पळू लागले. मात्र, मधमाशांच्या दंशामुळे १२ जण जखमी झाले. घटनेनंतर जखमी शेतमजुरांना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतात काम करताना अशा नैसर्गिक धोका टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande