अमरावती- सोशल मिडीयातून आक्षेपार्ह व्हिडिओ हटवण्याचे पोलिसांपुढे आव्हान
अमरावती, 14 एप्रिल(हिं.स.) अमरावती जिल्ह्यातील अचलपूर आणि परतवाडा शहरातील अल्पवयीन तरुणींचे शोषण करणारा नराधम आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला कोर्टात उभे केले असता न्यायालयाने अयानला 21 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी द
अमरावती- सोशल मिडीयातून आक्षेपार्ह व्हिडिओ हटवण्याचे पोलिसांपुढे आव्हान


अमरावती, 14 एप्रिल(हिं.स.) अमरावती जिल्ह्यातील अचलपूर आणि परतवाडा शहरातील अल्पवयीन तरुणींचे शोषण करणारा नराधम आरोपी

अयान अहमद तन्वीर अहमद याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला कोर्टात उभे केले असता न्यायालयाने अयानला 21 एप्रिलपर्यंत पोलिस

कोठडी दिलीय. आता अयानने या मुलींचे सोशल मिडीयावर व्हायरल केलेले अश्लिल फोटो आणि व्हिडीओ हटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढेउभे ठाकले आहे.

समाज माध्यमांवर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित होत असल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहचली होती. दरम्यान, भाजपचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची काल भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. दुसरीकडे, भाजपचे अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे हेही अचलपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात धडकले आणि त्यांनी आरोपींच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणात सुमारे १८० व्हिडिओ प्रसारित झाल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित फोटो आणि व्हिडिओमधील मुली प्राथमिकदृष्ट्या अल्पवयीन वाटत असून पीडित मुलींचा आणि पालकांचा शोध घेण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु भीतीपोटी अद्याप कोणतीही पीडित मुलगी किंवा मुलींचे पालक तक्रार देण्यास समोर आलेले नाहीत, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाला दिली असून समाज माध्यमांवर प्रसारित आक्षेपार्ह व्हिडिओ वगळण्याची विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली. हे आक्षेपार्ह व्हिडिओ वगळण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. पीडित मुली किंवा त्यांच्या कुटुंबीयांची ओळख समोर येणार नाही, याची पुरेपूर दक्षता पोलिसांकडून घेतली जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande