महात्मा गांधी महाविद्यालयाच्या ३६ विद्यार्थ्यांची पोलीस व सैन्यदलात ऐतिहासिक निवड
लातूर, 14 एप्रिल (हिं.स.)। एकेकाळी ''शिक्षणाची पंढरी'' म्हणून भारतभर नावलौकिक मिळवलेले अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालय आता अंतर्गत मरगळ झटकून पुन्हा एकदा आपल्या सुवर्णकाळाकडे झेपावत आहे. महाविद्यालयाच्या ''करिअर कट्टा'' या नाविन्यपूर्
निवड


लातूर, 14 एप्रिल (हिं.स.)। एकेकाळी 'शिक्षणाची पंढरी' म्हणून भारतभर नावलौकिक मिळवलेले अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालय आता अंतर्गत मरगळ झटकून पुन्हा एकदा आपल्या सुवर्णकाळाकडे झेपावत आहे. महाविद्यालयाच्या 'करिअर कट्टा' या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून पहिल्याच वर्षी ३६ विद्यार्थ्यांनी पोलीस, सैन्यदल आणि संरक्षण दलात धडक मारली आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांची शहरातून वाजतगाजत भव्य सत्कार रॅली काढण्यात आली.

यामध्ये श्वेता करे, अंकिता जाधव (पुणे पोलीस), ओमकार चारोळे, श्रद्धा चारोळे (पिंपरी चिंचवड पोलीस) आणि पल्लवी जाधव (नांदेड पोलीस) या विद्यार्थिनींनी यश मिळवले आहे. तसेच एन.डी.एफ. मध्ये जाधव शुभम, कांबळे सुधीर, केंद्रे अजय, केंद्रे विजय, कच्छवे रोहन, शेख सोहेल, मुकनर कमलेश, पवार सूर्यकांत, चिलकरवार नारायण आणि ओम चव्हाण यांची निवड झाली आहे. अग्निवीर भरतीमध्ये चिलकरवार नंदकुमार, शिवभक्त राजेंद्र, मुंडे संभाजी, संविधान ढवळे, घुगे चंद्रकांत, कच्छवे सिद्धेश्वर आणि मुंडे धनाजी या तरुणांनी बाजी मारली आहे. या सर्व ३६ गुणवंतांच्या सन्मानार्थ काढण्यात आलेली रॅली संपूर्ण शहरात आकर्षणाचे केंद्र ठरली.

महाविद्यालयापासून सुरू झालेली ही रॅली शहरातील प्रमुख चौकातून मार्गस्थ झाली. यावेळी राष्ट्रवादी भवन येथे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव आणि शिवानंद हेंगण यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. बसवेश्वर चौक येथे नगराध्यक्ष ॲड. स्वप्निल व्हते, गणेश हाके, दिलीपराव देशमुख, नगरसेवक निखिल कासनाळे, संदीप खोमणे, अजिंक्य चामे, लक्ष्मण अलगुले यांनी जल्लोषात सत्कार केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील आणि देवानंद मुळे यांनी कौतुक केले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जयंती उत्सव समितीच्या वतीने गौरव करण्यात आला.

याप्रसंगी डी.वाय.एस.पी. अरविंद रायभोले व प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या नव्या जबाबदारीची जाणीव करून दिली.

विकास मंडळाचे अध्यक्ष ॲड. किशनराव बेंडकुळे, सचिव ॲड. पी. डी. कदम आणि प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने पुन्हा कात टाकली आहे. सिनेट सदस्य प्रा. डॉ. विनोद माने, प्रा. जी. व्ही. ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रा. पांडुरंग अर्जुन, प्रा. डी. डी. कदम, अभिजीत कदम, विशाल सोनकांबळे, अजय जाधव यांच्या विशेष परिश्रमामुळे हा निकाल शक्य झाला आहे. ३६ विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामुळे महात्मा गांधी महाविद्यालय पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावर अग्रस्थानी विराजमान झाले असून, अहमदपूरच्या वैभवात मोठी भर पडली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande