जळगावात ‘मोस्ट वॉन्टेड’ साखळी चोर ‘आतंक’ जेरबंद
जळगाव, 14 एप्रिल, (हिं.स.) महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये चैन स्नॅचिंगच्या (साखळी चोरी) गुन्ह्यांनी धुमाकूळ घालणारा कुख्यात गुन्हेगार सादिक अली उर्फ ‘आतंक’ इबादत अली इराणी याला जेरबंद करण्यात भुसावळ पोलिसांना यश आले आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस
जळगावात ‘मोस्ट वॉन्टेड’ साखळी चोर ‘आतंक’ जेरबंद


जळगाव, 14 एप्रिल, (हिं.स.) महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये चैन स्नॅचिंगच्या (साखळी चोरी) गुन्ह्यांनी धुमाकूळ घालणारा कुख्यात गुन्हेगार सादिक अली उर्फ ‘आतंक’ इबादत अली इराणी याला जेरबंद करण्यात भुसावळ पोलिसांना यश आले आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत शिताफीने ही कारवाई केली भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपीच्या ठावठिकाण्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे डी.बी. पथकाने योग्य नियोजन करत सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतले. बाजारपेठ पोलीस स्टेशनमधील एका गुन्ह्यात तो गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता.तपासादरम्यान समोर आले आहे की, आरोपी सादिक अली याने राज्याच्या विविध भागांत चैन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे केले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुका, जिल्हापेठ, चाळीसगाव शहर आणि चाळीसगाव ग्रामीण भागासह वर्धा, बुलढाणा (शेगाव, नांदुरा, खामगाव), धुळे आणि संभाजीनगर या जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तो फरार होता. त्यामुळे तो अनेक जिल्ह्यांसाठी ‘मोस्ट वॉन्टेड’ ठरला होता.सदरची धडाकेबाज कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande