
लातूर, 14 एप्रिल (हिं.स.)। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सम्राट मित्र मंडळ, लातूर-अहमदपूर (सामाजिक संघटना) यांच्या वतीने एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकर घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रत्यक्षात उतरवत,पुस्तक देऊन अभिवादन करण्याचा हा अभिनव प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत आझ सकाळ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ उपस्थित राहून मान्यवरांनी नागरिक व कार्यकर्त्यांनी ज्ञानरूपी पुस्तके येथे भेट देली.या उपक्रमाला समाजाच्या सर्व स्तरातून उत्स्फूर्त आणि भरभरून प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या वेळी प्रामुख्याने जेष्ठ नेते दिलीपरावजी देशमुख,मराठा सेवा संघाचे पदाधिकारी प्रा.गोविंदराव शेळके,नगर सेवक अमितभैय्या रेड्डी,रिपाई नेते अरूणभाऊ वाघंबर,सिनेट सदस्य अॅड.निखील कासनाळे, डाॅ.ओ.एल.किनगांवकर,माजी उपनगराध्यक्ष कलिमोद्दीन अहमद, पत्रकार दिनकर मद्देवार,गोपीनाथराव जोंधळे,जयंती मंडळाचे अध्यक्ष सुजीत गायकवाड,जीवन गायकवाड,अंजलीताई वाघंबर,अशोकराव चापटे ,लांडगे सर,विकास अधिकारी लामतुरे साहेब,शिळे सर,कांबळे सर,प्रकाश ससाणे,गोविंदराव गिरी,लखन गायकवाड ,सोहेल पठाण,डाॅ.निलेश मजगे आदींनी पुस्तके भेट दिले.
उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत सांगितले की, आजच्या काळात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची खरी गरज आहे आणि पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञान प्रसार हा त्यांच्या कार्याला खरी आदरांजली ठरते.
समाजामध्ये वाचन संस्कृती वाढावी, तरुण पिढीने ज्ञानाचा मार्ग स्वीकारावा आणि बाबासाहेबांचे विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचावेत या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आल्याची प्रतिक्रीया कार्यक्रमाचे नियोजक युवकनेते डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी (सचिव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती, अहमदपूर) यांनी दिली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे,सचिन बानाटे,आकाश पवार,शिक्षक नेते शिवाजीराव भालेराव,विलास चापोलीकर,अजय भालेराव यांच्या सह जयंती मंडळाचे पदाधिकारी तथा सम्राट मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
हा उपक्रम केवळ एक अभिवादन नव्हता, तर तो ज्ञान, विचार आणि परिवर्तनाचा संदेश देणारा एक प्रेरणादायी उपक्रम ठरला अशी प्रतिक्रीया समाजातून ऐकावयास मिळत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis