डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लातूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिवादन
लातूर, 14 एप्रिल (हिं.स.)। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे झालेल्या या कार्यक्रमाला
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती


लातूर, 14 एप्रिल (हिं.स.)। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे झालेल्या या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त मानसी मीना, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त बलभीम शिंदे, समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande