
बीड, 14 एप्रिल (हिं.स.)।भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून परळी येथील श्रीनाथ हॉस्पिटलमध्ये 'दिव्यांग सहाय्यक पोर्टल'चे मोफत नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या पुढाकाराने हे शिबिर १४ ते २९ एप्रिल दरम्यान सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत पार पडेल.
या नोंदणीमुळे पात्र दिव्यांगांना भविष्यात १५ हजार रुपयांचे आवश्यक साहित्य मिळण्यास मदत होणार आहे. माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि मंत्री अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, जास्तीत जास्त दिव्यांगांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis