छ. संभाजीनगर : ढोल,ताशांच्या गजरात बाबासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक
छत्रपती संभाजीनगर, 14 एप्रिल (हिं.स.)। भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तैलचित्राची ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत निळे फेटे बांधून सहभागी कुलगुरू यांच्यासह सर्व अधिकारी, शिक्षक व विद्यार्थ्यांनी उपस्थिता
Q


छत्रपती संभाजीनगर, 14 एप्रिल (हिं.स.)। भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तैलचित्राची ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत निळे फेटे बांधून सहभागी कुलगुरू यांच्यासह सर्व अधिकारी, शिक्षक व विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध स्पर्धा, व्याख्यान, प्रतिमेची मिरवणूक या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यापीठ गेटसमोरील पुतळयापासून तैलचित्राची मिरवणूक मंगळवारी काढण्यात आली. कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी तैलचित्रास पुष्प अर्पण करून मिरवणुकीची सुरुवात केली. मिरवणुकीत निळे फेटे घालून सहभागी झालेल्यांनी लक्ष वेधून घेतले. मुले- मुलींनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या मिरवणुकीत कुलगुरु डॉ.विजय फुलारी, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे यांच्यासह सर्व अधिष्ठाता, संवैधानिक अधिकारी, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande