रायगडमध्ये डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात
रायगड, 14 एप्रिल (हिं.स.) : रायगड जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. जिल्हाभर विविध ठिकाणी सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करून बाबासाहेबांना अभिवादन क
Raigad district was filled with the thoughts of Babasaheb


Raigad district was filled with the thoughts of Babasaheb


रायगड, 14 एप्रिल (हिं.स.) : रायगड जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. जिल्हाभर विविध ठिकाणी सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.

अलिबाग येथे डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे आणि माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

दरम्यान, जे.एस.एम. महाविद्यालयात 11 ते 14 एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत विविध स्पर्धा, वाचन सत्रे आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सुमारे 45 विद्यार्थ्यांनी दररोज 8 तास वाचन करून महामानवांना आदरांजली वाहिली. “मानवमुक्तीचे कार्य” या विषयावर झालेल्या निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

रेवदंडा येथील पंचशील नगरमध्येही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आकर्षक विद्युत रोषणाई, सजावट आणि भव्य व्यासपीठ यामुळे परिसर उत्सवमय झाला होता. ध्वजारोहण व दीपप्रज्वलनानंतर बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सायंकाळी पंचशील नगर ते रेवदंडा बाजारपेठ दरम्यान भव्य मिरवणूक काढण्यात आली.

मुरुड येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. याचे उद्घाटन विकास समिती सदस्या वासंती उमरोटकर यांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ. जे. के. कांबळे यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले.

कर्जत-नेरळ येथील आंबेडकर चौकातही विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.-------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande