पुण्यात रंगणार राष्ट्रभक्तीच्या सुरांचा अविष्कार
पुणे, 14 एप्रिल (हिं.स.) :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त तसेच राष्ट्र सेविका समितीच्या ९० व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधत ‘आकार पुणे’ संस्थेतर्फे ‘राष्ट्रभक्ती का चिरंतन प्रवाह’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यात रंगणार राष्ट्रभक्तीच्या सुरांचा अविष्कार


पुणे, 14 एप्रिल (हिं.स.) :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त तसेच राष्ट्र सेविका समितीच्या ९० व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधत ‘आकार पुणे’ संस्थेतर्फे ‘राष्ट्रभक्ती का चिरंतन प्रवाह’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम शुक्रवारी, १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६:३० वाजता स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह सुरेश तथा भैय्याजी जोशी तसेच राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका व्ही. शांता कुमारी (शांताक्का) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

देशाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या दोन संघटनांच्या समांतर प्रवासाला समर्पित असा हा सांगीतिक अविष्कार असणार आहे. ‘आकार पुणे’ संस्थेच्या वतीने या निमित्ताने एक वैशिष्ट्यपूर्ण संगीत सादरीकरण सादर करण्यात येणार असून, त्यात अनेक कलाकारांचा सहभाग असेल.

कार्यक्रमाची संकल्पना चित्रा देशपांडे, सुखदा खांडकेकर आणि श्रीकांत कोठे यांची असून, संहिता लेखन व निवेदन सुप्रिया गोडबोले यांनी केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १०० वर्षे आणि राष्ट्र सेविका समितीची ९० वर्षे पूर्ण होणे हा सामाजिक व राष्ट्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.-----------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande