
सोलापूर, 14 एप्रिल (हिं.स.)।
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती सोलापूर जिल्हा परिषदेत विविध कार्यक्रमांनी साजरी करणेत आली. विविध भिमगीतांनी सभागृह दणाणून गेले. जिल्हा परिषदेचे आवारातील संविधान कोनशिलेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार समाजकल्याण विभागाच्या सभापती संस्कृती सातपुते, कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीचे सभापती अॅड. अमृता वाघे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी संदीप कोहिणकर यांचे हस्ते पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मराठी सेवा संघाचे वतीने पक्षांसाठी सुरू केलेले पाण्याचे व्यवस्थेचा शुभारंभ मान्यवरांचे हस्ते करणेत आला. यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रारंभी दिप प्रज्वलन करून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करणेत आले. भिम शाहिर संदिप शिंदे प्रबोधन मंच सोलापूर, सादरकर्ते प्रा. जिवन संदिप शिदे व संच यांनी भीम गीत गायन केले. प्रारंभी समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी संविधान उद्देशिका वाचन केले.
भारताची राजधानी हैद्राबाद येथे करा. मध्यवर्ती ठिकाण असल्याचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचविले होते. बाबासाहेब यांते जीवन चरित्रावर निलेश विमल धायरकर पुणे यांनी राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर प्रबोधनपर मार्गदर्शन केले. डाॅ. बाबासाहेब यांनी भाषावाद व प्रांत वाद होणार नाही याची काळजी घेतली. भारतीय रुपयाचे अवमुल्यन होत असल्याचे ग्रंथातून त्यांनी स्पष्ट केले असल्याचे व्याख्याते धायरकर यांनी सांगितले. या कार्यक्रमात समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभार्थ्याचा व आंतरजातीय विवाह केलेले जोडप्यांचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वैद्य व उपाध्यक्ष पवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार , समाजकल्याण विभागाच्या सभापती संस्कृती सातपुते, कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीचे सभापती अॅड. अमृता वाघे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी संदीप कोहिणकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे , उप मुख्य कार्यकारी सुर्यकांत भुजबळ, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी , कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, शिक्षणाधिकारी कादर शेख , कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरूण क्षिरसागर, लिपिक वर्गीय संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, अधिक्षक गिरीष जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव , रणजित घोडके, अभिमन्यु कांबळे , विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे यांचेसह सर्व खातेप्रमुख हे प्रमुख उपस्थित होते. जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी प्रास्ताविक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड