भाजपा शिक्षक आघाडीचा पदाधिकारी नियुक्ती सोहळा व आढावा बैठक संपन्न
नांदेड, 14 एप्रिल (हिं.स.) : शिक्षक हा सामान्य नसून उद्याच्या भारताचे भविष्य घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्या हातात असते, असे गौरवोद्गार भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अँड. चैतन्यबापू देशमुख यांनी काढले. विष्णुपूरी परिसरातील सेवाभावी संस्थेत भाजपा
भाजपा शिक्षक आघाडीचा पदाधिकारी नियुक्ती सोहळा व आढावा बैठक संपन्न


नांदेड, 14 एप्रिल (हिं.स.) : शिक्षक हा सामान्य नसून उद्याच्या भारताचे भविष्य घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्या हातात असते, असे गौरवोद्गार भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अँड. चैतन्यबापू देशमुख यांनी काढले.

विष्णुपूरी परिसरातील सेवाभावी संस्थेत भाजपा शिक्षक आघाडी नांदेडच्या वतीने भव्य पदाधिकारी नियुक्ती पत्र वाटप सोहळा तसेच पदवीधर निवडणूक नोंदणी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला 178 शिक्षकांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संतुकराव हंबर्डे (जिल्हाध्यक्ष, भाजपा नांदेड दक्षिण ग्रामीण) होते. विशेष अतिथी म्हणून प्रदेश संयोजक डॉ. प्रशम कोल्हे, मराठवाडा संयोजक प्रा. संजय भातलंवडे, कोषाध्यक्ष डॉ. बालाजी गिरगावकर, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रा. राजेश कुलकर्णी, सहसंयोजक गणेश पाटील बेळीकर व बी.ए. जाधव उपस्थित होते.

अध्यक्षीय समारोपात डॉ. हंबर्डे यांनी भाजपा स्थापनेचा इतिहास, कलम 370 रद्दीकरण तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या योगदानाबाबत मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते डॉ. प्रशम कोल्हे यांनी आकडेवारी व उदाहरणांसह केंद्र व राज्य सरकारने शिक्षकांच्या हितासाठी केलेल्या कामांचे सविस्तर विवेचन केले.

प्रा. संजय भातलंवडे यांनी पदवीधर नोंदणीचे महत्त्व स्पष्ट करत शिक्षकांना नोंदणी अर्जांचे वितरण केले. कार्यक्रमात एकूण 30 मंडळातील पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन प्रा. राजेश कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन बी.ए. जाधव यांनी मानले.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande