'कोलाज भावनांचा' कवितासंग्रहास राष्ट्रसंत गाडगे बाबा पुरस्कार जाहीर
नांदेड, 14 एप्रिल (हिं.स.)। संवेदनशील कवयित्री रुचिरा बेटकर यांच्या कोलाज भावनांचा या कविता संग्रहाला शिर्डी येथील डेबूजी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा साहित्य पुरस्कार 2026 जाहीर झाला आहे. '' कोलाज भावनांचा
'कोलाज भावनांचा' कवितासंग्रहास राष्ट्रसंत गाडगे बाबा पुरस्कार जाहीर


नांदेड, 14 एप्रिल (हिं.स.)। संवेदनशील कवयित्री रुचिरा बेटकर यांच्या कोलाज भावनांचा या कविता संग्रहाला शिर्डी येथील डेबूजी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा साहित्य पुरस्कार 2026 जाहीर झाला आहे. ' कोलाज भावनांचा' हा रुचिरा बेटकर यांचा पहिलाच कविता संग्रह असून मानवी मनातील भावनांचा कोलाहल त्यांनी या

कविता संग्रहातून साकारल्या आहेत. त्यांच्या या कवितासंग्रहाची डेबुजी फाउंडेशन च्या वतीने दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा साहित्य पुरस्कार 2026 साठी निवड करण्यात आली आहे. शिर्डी येथे 26 एप्रिल रोजी पार पडणाऱ्या 28 व्या राष्ट्रसंत गाडगे महाराज साहित्य संमेलनात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल साहित्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रुचिरा बेटकर यांचे अभिनंदन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande