
मुंबई, 14 एप्रिल, (हिं.स.)। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मंगळवारी (दि. १४) लोकभवन येथे डॉ. आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर