महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा धुळ्यात सर्वत्र जल्लोष
धुळे, 14 एप्रिल (हिं.स.) संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा धुळ्यात काल रात्रीपासूनच प्रचंड जल्लोष सुरु झाला आहे. सर्वत्र भिमगितांची धुम आणि भिमरायाच्या चरणी वंदना करण्यासाठी आज सकाळ पासून धुळे शहरातील मध्यवर्ती स्मारक स्थळी
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा धुळ्यात सर्वत्र जल्लोष


धुळे, 14 एप्रिल (हिं.स.) संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा धुळ्यात काल रात्रीपासूनच प्रचंड जल्लोष सुरु झाला आहे. सर्वत्र भिमगितांची धुम आणि भिमरायाच्या चरणी वंदना करण्यासाठी आज सकाळ पासून धुळे शहरातील मध्यवर्ती स्मारक स्थळी अभिवादनासाठी विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि आंबेडकरी अनुयायींची रीघ लागली आहे. सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी पुष्पहार अर्पण करुन मानवंदना दिली. तसेच भारतीय बौध्द महासंघाच्या वतीने बुध्द वंदना करण्यात आली. समता सैनिक दलाने देखील विशेष मानवंदना दिली. राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या वतीने सुध्दा अभिवादन करण्यात आले. तसेच धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, साक्रीच्या आमदार मंजुळा गावीत, आमदार राम भदाणे, माजी आ.शरद पाटील, खासदार डॉ.शोभाताई बच्छाव, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, आरपीआय पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्सना पाटील, प्रफुल्ल पाटील, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, उपाध्यक्ष अशोक सुडके, प्रा.अरविंद जाधव, बबलू पाटील, राजेंद्र इंगळे, ज्येष्ठ नेते किरणतात्या जोंधळे, पै.जयवंत वानखेडकर, ऍड.किशोर जाधव, बिपीनचंद्र रोकडे यांच्यासह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande