रत्नागिरी : एलपीजीचा ट्रकच्या धडकेत खनिजाचा ट्रक उलटला
रत्नागिरी, 14 एप्रिल, (हिं. स.) : देवरूख-संगमेश्वर राज्यमार्गावरील लोवले येथे सोमवारी रात्री वळणावर एलपीजी ट्रकने समोरून धडक दिल्याने बॉक्साइटचा ट्रक दरीत कोसळला. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान एमएच ४६ बीएफ ६२१० क्रमांकाचा ए
संगमेश्वर ट्रक अपघात


रत्नागिरी, 14 एप्रिल, (हिं. स.) : देवरूख-संगमेश्वर राज्यमार्गावरील लोवले येथे सोमवारी रात्री वळणावर एलपीजी ट्रकने समोरून धडक दिल्याने बॉक्साइटचा ट्रक दरीत कोसळला.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान एमएच ४६ बीएफ ६२१० क्रमांकाचा एलपी ट्रक देवरूखहून संगमेश्वरकडे निघाला होता. चिपळूणहून बॉक्साइट भरून आंबाघाटाच्या दिशेने जाणारा एमएच १० सीआर ३४५६ क्रमांकाचा ट्रक समोरून येत होता. लोवले येथील वळणावर एलपी चालकाने वाहन रस्त्याच्या मधोमध आणल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

धडकेनंतर ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि बॉक्साइटने भरलेला ट्रक सुमारे पाच ते सहा फूट खोल दरीत कोसळला. अपघाताची तीव्रता इतकी होती की एलपी वाहनाच्या केबिनचा पूर्ण चक्काचूर झाला.

या अपघातात एलपी चालक बालाजी जलबा कोंडेवार (रा. नांदेड) केबिनमध्ये अडकून पडला होता. घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नांनंतर त्याला बाहेर काढण्यात आले. या धाडसी बचावकार्यामुळे त्याचे प्राण वाचले.

या अपघातात बालाजी कोंडेवार आणि ट्रकचालक मोहम्मद युसूफ शफी शेख दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तातडीने पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande