नाशिक टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणाचा तपास तीव्र; राष्ट्रीय तपास यंत्रणांचीही मदत घेणार
पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांची माहिती नाशिक, 15 एप्रिल (हिं.स.) : नाशिक शहरातील टाटा कन्स्टंन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरणाचा तपास अधिक तीव्र करण्यात आला असून या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणांची (एनआयए) मदत घेतली जात असल्
Nashik Police seeking help


पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांची माहिती

नाशिक, 15 एप्रिल (हिं.स.) : नाशिक शहरातील टाटा कन्स्टंन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरणाचा तपास अधिक तीव्र करण्यात आला असून या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणांची (एनआयए) मदत घेतली जात असल्याची माहिती नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे. परदेशातून या आरोपींना काही मदत किंवा मार्गदर्शन मिळत होते का, या दिशेनेही तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक शहरातील डब्ल्यूएनएस नावाच्या कंपनीमध्ये हिंदू धर्मातील महिला, मुली तसेच काही पुरुषांवर मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला जात होता तसेच त्यांना कामाच्या ठिकाणी अनुचित वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या तक्रारीनंतर नाशिक पोलीस आयुक्तालयाने गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले.

तपासादरम्यान पोलिसांच्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची टीम कंपनीमध्ये पाठवून पीडितांशी संवाद साधण्यात आला. त्यांना धीर देत तक्रार नोंदवण्यासाठी मदत करण्यात आली, अशी माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली.

या प्रकरणात आतापर्यंत तौसीफ अत्तर, रजा मेमन, शाहरुख कुरैशी, शफी शेख आणि आसिफ अन्सारी यांच्यासह अनेक आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये अ‍ॅट्रॉसिटी आणि जबरदस्ती धर्मांतरासंबंधीचे गुन्हेही समाविष्ट आहेत.

एका प्रकरणात रिसॉर्टमध्ये कथित लैंगिक अत्याचार झाल्याचे आरोप असून त्यासंदर्भातील पुरावेही पोलिसांनी गोळा केल्याचे सांगण्यात आले आहे.

या संपूर्ण प्रकरणात कोणतीही संघटना, परदेशी मदत किंवा आर्थिक पुरवठा झाला आहे का, याचाही तपास एनआयए, एटीएस आणि इतर केंद्रीय यंत्रणांच्या सहकार्याने केला जात असल्याचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्पष्ट केले. तपास अद्याप सुरू असून पुढील कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.----------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande