
नवी दिल्ली, १५ एप्रिल (हिं.स.). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल सम्राट चौधरी यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सर्वांगीण विकासाचा विश्वास व्यक्त केला.
सोशल मीडियावरील आपल्या संदेशात पंतप्रधान मोदी म्हणाले की, सम्राट चौधरी यांची ऊर्जा, लोकसेवेप्रती असलेली निष्ठा आणि प्रत्यक्ष अनुभव बिहारच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य लोकांच्या आकांक्षा पूर्ण करत नवीन उंची गाठेल.पंतप्रधानांनी बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव यांचेही मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, दोन्ही नेत्यांचा व्यापक अनुभव आणि लोककल्याणाप्रती असलेली वचनबद्धता राज्याच्या विकासाला नवी दिशा आणि गती देईल. नवीन सरकार सुशासन, पारदर्शकता आणि जनकल्याण या क्षेत्रांमध्ये नवीन मापदंड प्रस्थापित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे