
नवी दिल्ली, 15 एप्रिल (हिं.स.)। माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षा साध्वी निरंजन ज्योती यांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. त्यांच्या अधिकृत ईमेलवर आलेल्या धमकीत कार्यालय आणि निवासस्थानाला लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, आज सकाळी सव्वा ११ वाजता साध्वी निरंजन ज्योती आपल्या कार्यालयात उपस्थित होत्या. त्याच वेळी त्यांच्या अधिकृत ईमेलवर धमकीचा संदेश प्राप्त झाला. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. उल्लेखनीय म्हणजे, साध्वी यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नुकताच कार्यभार स्वीकारला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule