पंजाब सरकारने काढून घेतली राघव चड्ढांची सुरक्षा
चंदीगड, 15 एप्रिल (हिं.स.)पंजाब सरकारने आम आदमी पक्षाचे माजी खासदार राघव चड्ढा यांची सुरक्षा काढून घेतली आहे. आम आदमी पक्षाने अलीकडेच एक मोठा संघटनात्मक बदल करत, आपले राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवले. त्यांच्या जागी डॉ
राघव चड्ढा


चंदीगड, 15 एप्रिल (हिं.स.)पंजाब सरकारने आम आदमी पक्षाचे माजी खासदार राघव चड्ढा यांची सुरक्षा काढून घेतली आहे. आम आदमी पक्षाने अलीकडेच एक मोठा संघटनात्मक बदल करत, आपले राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवले. त्यांच्या जागी डॉ. अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली. आता त्यांची सुरक्षाही काढून घेण्यात आली आहे. 'आप'चे नेते सौरभ भारद्वाज यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते की, केंद्र सरकार राघव चड्ढा यांना सुरक्षा पुरवणार आहे.

राघव चड्ढा यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवताना, आम आदमी पक्षाने त्यांच्यावर पंजाबशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे संसदेत मांडण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. त्यांची निष्क्रियता पक्षाच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचे सांगत पक्षाने त्यांच्यावर टीका केली. यावर राघव यांनू प्रत्युत्तर देत म्हटले होते की, 'नानकाना साहिब कॉरिडॉर' आणि 'बठिंडा ट्रेन' संदर्भात राज्यसभेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांशी संबंधित व्हिडिओ त्यांनीही सोशल मीडियावर शेअर केला होता.

यापूर्वी, २ एप्रिल रोजी आम आदमी पक्षाने राघव चड्ढा यांना राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवले. त्यांच्या जागी पंजाबचे खासदार अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाने राज्यसभा सचिवालयाला असेही कळवले की, चड्ढा यांना यापुढे पक्षाच्या कोट्यातून बोलण्याचा वेळ दिला जाणार नाही. या निर्णयामुळे चड्ढा आणि पक्ष नेतृत्व यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande