
मुंबई, 16 एप्रिल, (हिं.स.)। प्रेक्षकांसाठी नेहमीच दर्जेदार आणि आशयघन मनोरंजन सादर करण्याची परंपरा जपणारी सोनी मराठी वाहिनी आता एक भव्य आणि आध्यात्मिक अनुभव घेऊन येत आहे. समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेल्या ‘महावतार नरसिंह’ या ॲनिमेटेड चित्रपटाचा मराठी वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर रविवार १९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर होणार आहे.
वर्षातला सर्वाधिक गाजलेला आणि या वर्षातला बेस्ट ॲनिमेटेड सिनेमा पुरस्कारानं सन्मानित झालेला हा चित्रपट आता मराठी प्रेक्षकांसाठी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर येत आहे. नेत्रदीपक ॲनिमेशन, प्रभावी कथानक आणि भावनिक सादरीकरण यांमुळे सर्व वयोगटांतल्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा अनुभव हा चित्रपट देईल.
भारतीय पौराणिक कथांवर आधारित ‘महावतार नरसिंह’ हा चित्रपट श्रद्धेची, न्यायाची आणि दैवी शक्तीची गाथा प्रभावीपणे मांडतो. भगवान नरसिंहांच्या अद्भुत अवताराची कथा अत्याधुनिक ॲनिमेशनच्या माध्यमातून साकारत हा चित्रपट ‘सत्याचा असत्यावर विजय’ हा सार्वकालिक संदेश देतो. मुलांपासून कुटुंबांपर्यंत आणि पौराणिक कथांच्या चाहत्यांपर्यंत सर्वांना आकर्षित करणारा हा चित्रपट भव्यता आणि भावनिक खोली यांसाठी विशेष ठरतो.
प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून मिळालेल्या अफाट प्रतिसादानंतर आता महावतार नरसिंह मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे... सोनी मराठी वाहिनीच्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आशय सादर करण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करत...!
पाहा ‘महावतार नरसिंह’चा मराठी वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर रविवार १९ एप्रिलला, दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर...!
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर