
नाशिक, 16 एप्रिल (हिं.स.)।
लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार देऊन मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी श्रेयस ऊर्फ राज नीलेश दिघे (वय २१, रा. लाल चौक, मु. पो. ता. सिन्नर) याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पीडितेशी वारंवार गोड बोलून तिला सातपूरच्या फाशीच्या डोंगराजवळ असलेल्या एका लॉजवर नेऊन तिच्याशी जबरदस्तीने वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडितेने दिघे याला लग्नाबाबत विचारले असता त्याने लग्नास नकार देऊन पीडितेला मारहाण केली. हा प्रकार सप्टेंबर २०२५ ते दि. १६ मार्च २०२६ या कालावधीत घडला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात श्रेयस दिघेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दहिफळे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV