प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर लैंगिक अत्याचार, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नाशिक, 16 एप्रिल (हिं.स.)। तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पाच तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी आरशील साबीर मन्सुरी
प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर लैंगिक अत्याचार, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल


नाशिक, 16 एप्रिल (हिं.स.)।

तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पाच तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी आरशील साबीर मन्सुरी (रा. त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक याने फिर्यादी पीडितेशी सलगी करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यासोबत लग्न करण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर तिला सन २०२२ ते ३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सातपूर येथे हॉटेल डेमोक्रसी येथे नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून त्याचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्डवर ठेवले, तसेच तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याकडील सोन्याची चेन व कानातील दागिने आरोपी अरशील मन्सुरी याने जबरदस्तीने काढून घेऊन स्वतःकडे ठेवून घेतले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अरशील मन्सुरीसह त्याला मदत करणाऱ्या दीपक, हिमांशु, दिनेश व प्रथमेश या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भंडे करीत आहेत

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande