
नाशिक, 16 एप्रिल (हिं.स.)। नाशिकमधील टाटा टन्स्टंन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीतील धर्मांतरण प्रकरणाचे 2 आरोपी शफी शेख आणि मेनन
यांना 2 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. शफी शेख आणि इतर आरोपी टीसीएसची एचआर मॅनेजर निदा खान हिच्या मार्गदर्शनातटीसीएसमधील हिंदू तरुणींचे लैंगिक शोषण, मानसिक छळ करून धर्मांतरणासाठी दबाव टाकत होते. याप्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानगेल्या 20 दिवसांपासून फरार आहे.
नाशिकच्या टीसीएस कंपनीतील लैंगिक छळ, अवैध धर्मांतरण रॅकेट प्रकरणी पोलिसांनी 9 एफआयआर दाखल केले असून 7 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी म्हणून येथील आरोपी शफी शेख , व त्याचा दुसरा सहकारी मेमन यांना दुसऱ्या एका गुन्ह्याच्या तपासात पोलीस कस्टडी मिळण्यासाठी म्हणून गुरुवारी नाशिकच्या न्यायालयामध्ये हजर केले होते. यावेळी आरोपी शफी शेख याने नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये इतर कैद्यांकडून मारहाण झाल्याची माहिती न्यायालयात दिली. परंतु, मारहाणीचे कारण काय, वार मात्र शेखने कोर्टाला काहीचसांगितले नाही. याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींची 2 दिवसांची कोठडी विशेष तपास पथकाला दिली आहे. या आरोपींच्याचौकशीत नेमकी काय माहिती पुढे येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV