अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या दरात वाढ; ग्राहकांमध्ये संभ्रम
जळगाव, 18 एप्रिल, (हिं.स.) - उद्या, १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया साजरी होत आहे. परंपरेनुसार या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे सराफ बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, ऐन मुहूर्ताच्या आदल्या दिवशीच सोने आणि चा
सोनं


जळगाव, 18 एप्रिल, (हिं.स.) - उद्या, १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया साजरी होत आहे. परंपरेनुसार या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे सराफ बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, ऐन मुहूर्ताच्या आदल्या दिवशीच सोने आणि चांदीच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे खरेदीदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

शुक्रवारी सोन्याच्या दरात किंचित घट झाल्याने ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला होता. पण शनिवारी बाजार सुरू होताच परिस्थिती बदलली. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ८१० रुपयांनी वाढून १,५५,७८० रुपयांवर पोहोचला. ८ ग्रॅमसाठी हा दर ६४८ रुपयांनी वाढून १,२४,६२४ रुपये झाला आहे. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ७५० रुपयांनी वाढून १,४२,८०० रुपये झाला आहे, तर १८ कॅरेट सोन्याचा दर ६१० रुपयांनी वाढून १,१६,८४० रुपयांवर गेला आहे.चांदीच्या दरातही मोठी उडी पाहायला मिळाली. एका दिवसातच चांदीच्या किमतीत तब्बल १०,००० रुपयांची वाढ झाली असून आता एक किलो चांदीचा दर २,७५,००० रुपयांवर पोहोचला आहे. या अचानक वाढलेल्या दरामुळे अक्षय्य तृतीयेच्या खरेदीबाबत अनेकजण द्विधा मनःस्थितीत आहेत. वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर ताण येण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande