पॅरालिम्पिक चॅम्पियन सुमित अंतिलचा प्रशिक्षकावर मानसिक छळाचा आरोप
-दारू प्यायल्यानंतर खेळाडूंना शिवीगाळ केल्याचा प्रशिक्षकांवर आरोप-खेळाडूंची साईकडे लेखी तक्रार आणि ऑडिओ रेकॉर्डिंग सादर नवी दिल्ली, 18 एप्रिल (हिं.स.) : पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता सुमित अंतिलने द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक नवल सिंग यां
नीरज चोप्रा आणि सुमित अंतिल


-दारू प्यायल्यानंतर खेळाडूंना शिवीगाळ केल्याचा प्रशिक्षकांवर आरोप-खेळाडूंची साईकडे लेखी तक्रार आणि ऑडिओ रेकॉर्डिंग सादर

नवी दिल्ली, 18 एप्रिल (हिं.स.) : पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता सुमित अंतिलने द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक नवल सिंग यांच्यावर मानसिक छळ आणि शाब्दिक गैरवर्तनाचे गंभीर आरोप केले आहेत. या तक्रारीला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने पाठिंबा दिला आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडे (SAI) केलेल्या लेखी तक्रारीत अंतिलने म्हटले आहे की, प्रशिक्षक नवल सिंग यांनी केवळ त्याचा मानसिक छळच केला नाही, तर त्याच्याशी आणि नीरज चोप्राच्या कुटुंबीयांशीही गैरवर्तन केले. त्याने असाही आरोप केला आहे की, प्रशिक्षकाने जाणूनबुजून अपमानास्पद टिप्पणी रेकॉर्ड करून त्या संघ व्यवस्थापनाकडे पाठवल्या, जेणेकरून त्या खेळाडूंपर्यंत पोहोचतील.

SAI ने तक्रार मिळाल्याचे मान्य केले, पण स्पष्ट केले की नवल सिंग हे त्यांचे कर्मचारी नाहीत. ते AFI च्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरांतर्गत दुसऱ्या एका अव्वल खेळाडूला प्रशिक्षण देत आहेत.अंतिलने सांगितले की, त्याच्या तक्रारीला नीरज चोप्रा, पॅरा-ॲथलीट नवदीप सिंग आणि संदीप चौधरी यांनी पाठिंबा दिला आहे. त्याने सांगितले की, तक्रार दाखल करून एक आठवडा झाला आहे. पण कोणतीही ठोस कारवाई किंवा अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. अव्वल खेळाडूंचा आवाज ऐकला जात नसेल तर इतर खेळाडूंना न्याय कसा मिळेल, असा प्रश्नही त्याने उपस्थित केला.

प्रशिक्षक नवल सिंग यांना २०१५ मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला होता आणि ते सध्या उदयोन्मुख भालाफेकपटू सचिन यादवला प्रशिक्षण देत आहेत. सचिन यादवने नीरज चोप्रापेक्षा चांगली कामगिरी करावी, या इच्छेमुळे प्रशिक्षकाचे हे वर्तन असू शकते, असा संशय अंतिलला होता. हे प्रकरण आता क्रीडाविश्वात गंभीर चर्चेचा विषय बनले असून, साई (SAI) आणि एएफआय (AFI) यांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande