शफाली वर्मा १०० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी पाचवी भारतीय महिला क्रिकेटपटू
डर्बन, १९ एप्रिल (हिं.स.)भारतीय महिला क्रिकेट संघाची युवा सलामीवीर शफाली वर्माने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्स यांच्यानंतर १०० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी ती पाचवी भार
शफाली वर्मा


डर्बन, १९ एप्रिल (हिं.स.)भारतीय महिला क्रिकेट संघाची युवा सलामीवीर शफाली वर्माने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्स यांच्यानंतर १०० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी ती पाचवी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. डर्बनमधील किंग्समीड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान शफालीने हा टप्पा गाठला.

या ऐतिहासिक कामगिरीपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमध्ये, शफालीने आपल्या भावना व्यक्त केल्या आणि सांगितले की हा तिच्यासाठी एक खूप खास क्षण आहे. ती म्हणाली, मी माझे संपूर्ण बालपण क्रिकेटला समर्पित केले आहे. ज्या वयात लहान मुले त्यांच्या पालकांसोबत खेळतात, त्या वयात मी स्वतःला पूर्णपणे क्रिकेटसाठी वाहून घेतले. मी वयाच्या १५ व्या वर्षी पदार्पण केले आणि आता मी माझा १०० वा टी-२० सामना खेळणार आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण मला इथेच थांबायचे नाही; मला कठोर परिश्रम करत राहायचे आहे आणि दररोज अधिक चांगले व्हायचे आहे.

शफालीने आठवण करून दिली की तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवातही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच झाली होती आणि आज ती त्याच संघाविरुद्ध आपला १०० वा टी-२० सामना खेळत आहे. ती म्हणाली, मला तो क्षण अजूनही आठवतो जेव्हा मी मैदानावर आले आणि स्मृतीकडून माझी कॅप स्वीकारली. तो माझ्या आयुष्यातील सर्वात खास क्षण होता. ती पुढे म्हणाली, सध्या माझी अनेक ध्येये आहेत. भारतासाठी शक्य तितक्या जास्त आयसीसी ट्रॉफी जिंकणे हे माझे स्वप्न आहे.

शफाली वर्माने २४ सप्टेंबर २०१९ रोजी सुरतमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तेव्हापासून, ९९ टी२० सामन्यांमध्ये तिने २७.७५ च्या सरासरीने आणि १३५.२२ च्या प्रभावी स्ट्राइक रेटने २,५५३ धावा केल्या आहेत, ज्यात १४ अर्धशतकांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande