
बीड, 20 एप्रिल (हिं.स.)। केज तालुक्यात आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अंध झालेल्या एका ४० वर्षीय महिलेने आपल्याच सावत्र मुलासोबत पलायन केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पीडित पती मुंबईला गेला असता, पाठीमागे त्याच्या दुसऱ्या पत्नीने आणि पहिल्या पत्नीच्या मुलाने संधी साधून घरातून पळ काढला. विशेष म्हणजे, या दोघांनी पळून जाण्यासाठी आपल्याच जावयाच्या दुचाकीचा वापर केला. या कृत्याचा उलगडा तेव्हा झाला जेव्हा तेलंगणातील गच्चीबोली येथे वाहतूक नियम मोडल्याचा दंडाचा मेसेज जावयाच्या मोबाईलवर आला. एका बाजूला पत्नी, दुसऱ्या बाजूला मुलगा आणि पळून जाण्यासाठी वापरलेली गाडी जावयाची, अशा विचित्र कात्रीत हतबल बाप अडकला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर या प्रकरणाचा तपास करत असून या घटनेमुळे सामाजिक नैतिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis