जळगावात गावठी पिस्तूल अन् ५ जिवंत काडतुसांसह दोघे ताब्यात
जळगाव, 20 एप्रिल (हिं.स.)जिल्ह्यात गुन्हेगारीवर अंकुश मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने चोपडा तालुक्यात मोठी कारवाई करत, गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारा
जळगावात गावठी पिस्तूल अन् ५ जिवंत काडतुसांसह दोघे ताब्यात


जळगाव, 20 एप्रिल (हिं.स.)जिल्ह्यात गुन्हेगारीवर अंकुश मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने चोपडा तालुक्यात मोठी कारवाई करत, गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोटारसायकल आणि मोबाईलसह ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.राहुल कुवरसिंग पावरा (वय २२, रा. उमर्टी, ता. चोपडा, जि. जळगाव) आणि गणपत प्रभाकर किर्तने (वय २८, रा. असोला जवळ बाजार, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) अशी अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून दोघांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की, उमर्टी गावाकडून कृष्णपूर ते मामलदे मार्गे चोपडा दिशेने दोन तरुण एका मोटारसायकलवरून विनापरवाना शस्त्र घेऊन येत आहेत. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी मामलदे मार्गावर सापळा रचला. काही वेळातच उमर्टीकडून येणारी हिरो होंडा मोटारसायकल (क्र. MH-१९-S-१४५०) पोलिसांना दिसली. पोलिसांनी शिताफीने ही मोटारसायकल अडवून त्यावरील दोन संशयितांना ताब्यात घेतले. अटकेनंतर झडती घेतली असता त्यांच्याकडून १ गावठी पिस्तुल, ५ जिवंत काडतुसे, १ मोटारसायकल व २ मोबाईल फोन असा एकूण ६९,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांवर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande