
बीड, 20 एप्रिल (हिं.स.)।अंबाजोगाई तालुक्यातील माकेगाव येथे शेतीच्या बांधावरून असलेल्या जुन्या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले असून, एका व्यक्तीवर दगडाने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना टेलरच्या दुकानासमोर घडली असून याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या हल्ल्यात कल्याण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मेंदूवर लातूर येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. फिर्यादी संजय देशमुख यांच्या तक्रारीनुसार, आरोपी यांनी संगनमत करून हे कृत्य केले. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या घरगुती वादातून आरोपींनी कल्याण यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने पकडून त्यांच्या डोक्यात दगडाने प्रहार केला. मध्यस्थी करणाऱ्या फिर्यादीलाही यावेळी धक्काबुक्की करण्यात आली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ आणि ११५(२) सह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक जगताप पुढील तपास करत आहेत.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis