सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारावर दबाव; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किरकोळ घसरण
नवी दिल्ली, 20 एप्रिल (हिं.स.)। देशांतर्गत शेअर बाजारात आज सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर दबाव कायम असल्याचे दिसून येत आहे. आजच्या व्यवहाराची सुरुवात तेजीने झाली होती. बाजार उघडल्यानंतर खरेदीच्या जोरावर सेन्सेक्स आणि निफ्ट
Stock Market Early Trade


नवी दिल्ली, 20 एप्रिल (हिं.स.)। देशांतर्गत शेअर बाजारात आज सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर दबाव कायम असल्याचे दिसून येत आहे. आजच्या व्यवहाराची सुरुवात तेजीने झाली होती. बाजार उघडल्यानंतर खरेदीच्या जोरावर सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये वाढ झाली. मात्र, पहिल्या 10 मिनिटांतच विक्रीचा दबाव वाढल्याने या दोन्ही निर्देशांकांची चाल कमजोर झाली. सकाळी 10 वाजेपर्यंतच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स 0.01 टक्के आणि निफ्टी 0.09 टक्क्यांच्या किरकोळ कमजोरीसह व्यवहार करत होते.

आज सकाळी 10 वाजेपर्यंतच्या व्यवहारानंतर शेअर बाजारातील प्रमुख शेअर्समध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, ट्रेंट लिमिटेड, एक्सिस बँक आणि एनटीपीसी यांच्या शेअर्समध्ये 2.14 टक्क्यांपासून 0.50 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून येत होती. दुसरीकडे, जिओ फायनान्शियल, टीएमपीव्ही, एचडीएफसी लाइफ, हिंदाल्को इंडस्ट्रीज आणि एटरनल यांच्या शेअर्समध्ये 3.62 टक्क्यांपासून 1.47 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली जात होती.

आतापर्यंतच्या व्यवहारात शेअर बाजारात 2,776 शेअर्समध्ये सक्रिय ट्रेडिंग होत होते. यापैकी 945 शेअर्स नफ्यात राहून हिरव्या चिन्हात व्यवहार करत होते, तर 1,831 शेअर्स तोट्यात राहून लाल चिन्हात व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 9 शेअर्स खरेदीच्या जोरावर हिरव्या चिन्हात होते, तर 21 शेअर्स विक्रीच्या दबावाखाली लाल चिन्हात व्यवहार करत होते. निफ्टीमधील 50 शेअर्सपैकी 10 शेअर्स हिरव्या चिन्हात तर 40 शेअर्स लाल चिन्हात होते.

बीएसईचा सेन्सेक्स आज 139.36 अंकांच्या वाढीसह 78,632.90 अंकांवर उघडला. व्यवहार सुरू होताच खरेदी वाढल्यामुळे हा निर्देशांक 78,733.25 अंकांपर्यंत पोहोचला. त्यानंतर बाजारात विक्री वाढल्याने सेन्सेक्समध्ये घसरण सुरू झाली. सततच्या विक्रीमुळे हा निर्देशांक लवकरच आपली वाढ गमावून बसला. बाजारात सुरू असलेल्या खरेदी-विक्रीदरम्यान सकाळी 10 वाजेपर्यंत सेन्सेक्स 5.82 अंकांच्या किरकोळ घसरणीसह 78,487.72 अंकांवर व्यवहार करत होता.

सेन्सेक्सप्रमाणेच एनएसईचा निफ्टी आज 37.95 अंकांच्या वाढीसह 24,391.50 अंकांवर उघडला. बाजार उघडल्यानंतर खरेदीच्या जोरावर पहिल्या 10 मिनिटांतच हा निर्देशांक 24,420.20 अंकांपर्यंत गेला. त्यानंतर विक्री वाढल्यामुळे निफ्टीची चाल कमजोर झाली. सततच्या विक्रीमुळे अर्ध्या तासाच्या व्यवहारानंतर हा निर्देशांक 24,241.25 अंकांपर्यंत घसरला. बाजारातील खरेदी-विक्री सुरू असताना सकाळी 10 वाजेपर्यंत निफ्टी 20.75 अंकांनी घसरून 24,332.80 अंकांवर व्यवहार करत होता.

यापूर्वी, मागील आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी शुक्रवारी सेन्सेक्स 504.86 अंक म्हणजेच 0.65 टक्क्यांच्या वाढीसह 78,493.54 अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी 156.80 अंक म्हणजेच 0.65 टक्क्यांच्या वाढीसह 24,353.55 अंकांवर शुक्रवारी व्यवहार समाप्त झाला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande