पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर दहशत; ४-५ जणांचा हल्ला
रायगड, 20 एप्रिल (हिं.स.)। : पोलादपूर पोलीस ठाणे हद्दीत महाबळेश्वर मार्गावर गाडी अडवून चालक व प्रवाशांवर मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात अज्ञात ४ ते ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फ
**पोलादपूरमध्ये गाडी अडवून चालक व प्रवाशांवर हल्ला; गुन्हा दाखल**  पोलादपूर : पोलादपूर पोलीस ठाणे हद्दीत महाबळेश्वर मार्गावर गाडी अडवून चालक व प्रवाशांवर मारहाण केल्याची घटना १८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात अज्ञात ४ ते ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील इको गाडी (क्र. एमएच ०६ सीएन ३६५३) मधून साक्षीदारांना चोळई येथील कंपनीतून कापडे येथे सोडण्यासाठी जात होते. दरम्यान, रानबाजिरे गाव हद्दीत महाबळेश्वर रोडवर रस्त्याच्या डाव्या बाजूला दोन टेम्पो उभे होते. त्या ठिकाणी अचानक ४ ते ५ अनोळखी इसम रस्त्यावर आल्याने फिर्यादींनी गाडी नियंत्रणात घेत उजव्या बाजूला थांबवली.  यानंतर संबंधित इसम गाडीपाशी येऊन फिर्यादीशी वाद घालत शिवीगाळ करू लागले. गाडीत असलेले साक्षीदार खाली उतरल्यावर आरोपींनी गैरकायदेशीररीत्या जमाव करून फिर्यादी व एका साक्षीदारास मारहाण केली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले.  या घटनेप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११७(२), १८९(२), १८९(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बामणे करीत आहेत.


रायगड, 20 एप्रिल (हिं.स.)। : पोलादपूर पोलीस ठाणे हद्दीत महाबळेश्वर मार्गावर गाडी अडवून चालक व प्रवाशांवर मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात अज्ञात ४ ते ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील इको गाडी (क्र. एमएच ०६ सीएन ३६५३) मधून साक्षीदारांना चोळई येथील कंपनीतून कापडे येथे सोडण्यासाठी जात होते. दरम्यान, रानबाजिरे गाव हद्दीत महाबळेश्वर रोडवर रस्त्याच्या डाव्या बाजूला दोन टेम्पो उभे होते. त्या ठिकाणी अचानक ४ ते ५ अनोळखी इसम रस्त्यावर आल्याने फिर्यादींनी गाडी नियंत्रणात घेत उजव्या बाजूला थांबवली.

यानंतर संबंधित इसम गाडीपाशी येऊन फिर्यादीशी वाद घालत शिवीगाळ करू लागले. गाडीत असलेले साक्षीदार खाली उतरल्यावर आरोपींनी गैरकायदेशीररीत्या जमाव करून फिर्यादी व एका साक्षीदारास मारहाण केली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले.

या घटनेप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११७(२), १८९(२), १८९(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बामणे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande