कर्जतमध्ये शेजारी वादातून हिंसक हल्ला; आई-मुलगा जखमी
रायगड, 20 एप्रिल (हिं.स.)। : कर्जत पोलीस ठाणे हद्दीत मोडक आळी, साळवे (पो. मांडवणे, ता. कर्जत) येथे शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून मारहाणीची गंभीर घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने “दारू पिऊन आला” असे बो
**कर्जत तालुक्यात शेजाऱ्यांचा हल्ला; लोखंडी रॉड व दगडाने मारहाण, गुन्हा दाखल**  कर्जत : कर्जत पोलीस ठाणे हद्दीत १८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास मोडक आळी, साळवे (पो. मांडवणे, ता. कर्जत) येथे शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून मारहाणीची गंभीर घटना घडली.  मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने “दारू पिऊन आला” असे बोलल्याने वादाची ठिणगी पडली. यावरून फिर्यादीच्या आईने विचारणा केल्यानंतर वाद वाढत गेला. दरम्यान, आरोपी क्रमांक १ याने हातात लोखंडी रॉड व दगड घेऊन फिर्यादीच्या डोक्यावर वार केला. त्यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या मुलालाही आरोपीने दगडाने मारून जखमी केले.  यानंतर आरोपी क्रमांक २, ३ व ४ यांनीही संगनमत करून फिर्यादी व त्याच्या मुलावर दगडफेक करत मारहाण केली. तसेच घराच्या खिडकीवर दगड मारून काचांचे नुकसान केल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. या हल्ल्यात फिर्यादी व त्यांचा मुलगा दोघेही जखमी झाले.  या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७८/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३२४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.


रायगड, 20 एप्रिल (हिं.स.)। : कर्जत पोलीस ठाणे हद्दीत मोडक आळी, साळवे (पो. मांडवणे, ता. कर्जत) येथे शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून मारहाणीची गंभीर घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने “दारू पिऊन आला” असे बोलल्याने वादाची ठिणगी पडली. यावरून फिर्यादीच्या आईने विचारणा केल्यानंतर वाद वाढत गेला. दरम्यान, आरोपी क्रमांक १ याने हातात लोखंडी रॉड व दगड घेऊन फिर्यादीच्या डोक्यावर वार केला.

त्यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या मुलालाही आरोपीने दगडाने मारून जखमी केले.

यानंतर आरोपी क्रमांक २, ३ व ४ यांनीही संगनमत करून फिर्यादी व त्याच्या मुलावर दगडफेक करत मारहाण केली. तसेच घराच्या खिडकीवर दगड मारून काचांचे नुकसान केल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. या हल्ल्यात फिर्यादी व त्यांचा मुलगा दोघेही जखमी झाले.

या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७८/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३२४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande