पाकिस्तान सुपर लीगमध्ये बाबर आझमची शतक खेळी
इस्लामाबाद, 20 एप्रिल (हिं.स.) । पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज बाबर आझम पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२६ मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने पेशावर झल्मीकडून खेळताना शतक झळकावून, टी-२० क्रिकेटमधील त्याच्या स्ट्राईक रेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यां
बाबर आझम


इस्लामाबाद, 20 एप्रिल (हिं.स.) । पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज बाबर आझम पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२६ मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने पेशावर झल्मीकडून खेळताना शतक झळकावून, टी-२० क्रिकेटमधील त्याच्या स्ट्राईक रेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. पीएसएलमधील हे बाबरचे तिसरे शतक आहे. या डावादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १९० पेक्षा जास्त राहिला आहे.

सिक्स न मारल्याबद्दल आझमवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. पण, या सामन्यात त्यावे चार वेळा चेंडू सीमारेषेबाहेर पाठवत शानदार कामगिरी केली. हे बाबरच्या टी-२० कारकिर्दीतील १२ वे शतक आहे. २२ शतके झळकावणाऱ्या वेस्ट इंडिजचा माजी महान क्रिकेटपटू ख्रिस गेलनेच त्याला मागे टाकले आहे. पण, या क्रमवारीत बाबर दुसऱ्या स्थानावर आहे.

क्वेटा ग्लॅडिएटर्सने पेशावर झल्मीविरुद्ध नाणेफेक जिंकून त्यांना फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पेशावरकडून मोहम्मद हारिस आणि बाबर आझम यांनी डावाची सुरुवात केली. हॅरिस १६ धावांवर बाद झाला, पण आझमने शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून शतक झळकावले. बाबरने ५२ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि चार उत्तुंग षटकारांसह नाबाद १०० धावा केल्या. पीएसएलमधील हे बाबरचे तिसरे शतक आणि त्याच्या कारकिर्दीतील सर्वात जलद शतक होते.

पीएसएलमधील या शतकासह, बाबरने टी-२० क्रिकेटमधील आपले १२ वे शतकही पूर्ण केले. २२ शतके झळकावणाऱ्या ख्रिस गेलनंतर तो या फॉरमॅटमध्ये जगातील दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. ऑस्ट्रेलियन डेव्हिड वॉर्नर १० शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ग्लॅडिएटर्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना, झल्मीने तीन विकेट्स गमावून २५५ धावांचा भक्कम डोंगर उभा केला. बाबरच्या शतकाव्यतिरिक्त, कुसल मेंडिसनेही ४४ चेंडूंमध्ये ८३ धावा करत शानदार फलंदाजी केली. यामध्ये त्याने १० चौकार आणि तीन षटकार मारले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande