विराट आणि अनुष्का यांनी पुन्हा एकदा घेतले प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद
मथुरा, 20 एप्रिल (हिं.स.) विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासोबत पुन्हा एकदा वृंदावनमधील प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले आहे. सोमवारी प्रेमानंद महाराजांच्या ''श्री हित राधा केली कुंज'' या आश्रमात हे दोघे राधा भक्तीमध्ये मग्न झालेले दिसले. विराट आ
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा


मथुरा, 20 एप्रिल (हिं.स.) विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासोबत पुन्हा एकदा वृंदावनमधील प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले आहे. सोमवारी प्रेमानंद महाराजांच्या 'श्री हित राधा केली कुंज' या आश्रमात हे दोघे राधा भक्तीमध्ये मग्न झालेले दिसले. विराट आणि अनुष्का यांनी प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि सत्संग व खाजगी चर्चेतही भाग घेतला. या प्रसंगी त्यांनी अत्यंत साधा पेहराव केला होता. अनुष्काने ऑफ-व्हाइट रंगाचा सूट आणि कपाळावर ऊर्ध्वपुंड्र टिळा लावला होता. विराटनेही गळ्यात तुळशी माळ घातली होती आणि तो राधा भक्तीमध्ये मग्न असल्याचे दिसत होते. विशेष म्हणजे, विराट आणि अनुष्का गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेत आहेत. त्यांनी शेवटचे १७ फेब्रुवारी रोजी केली कुंज आश्रमाला भेट दिली होती.

गेल्या वर्षी, २०२५ मध्ये, विराट आणि अनुष्का यांनी वृंदावनमधील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाला तीन वेळा भेट दिली. इतकेच नाही, तर त्यांचा मुलगा अकायच्या जन्मानंतर, या जोडप्याने आपल्या दोन मुलांसह आश्रमाला भेट दिली होती. वामिका विराट कोहलीच्या मांडीवर होती, तर अकाय त्याची आई अनुष्कासोबत होता. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरही, या क्रिकेटपटूने आणि त्याच्या पत्नीने आश्रमाला भेट दिली आणि प्रेमानंद महाराजांना अनेक प्रश्न विचारले होते.

अनुष्काने विचारले, केवळ देवाच्या नावाचा जप करण्याच्या शक्तीने देव सापडू शकतो का? तेव्हा प्रेमानंद महाराजांनी त्या जोडप्याची प्रशंसा केली आणि त्यांना राधा नावाचा जप सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, एवढी संपत्ती आणि समृद्धी मिळवल्यानंतर देवाची उपासना करणे खूप कठीण आहे. म्हणून, माणसाने आपल्या कामात नेहमी नम्र राहिले पाहिजे.

आयपीएल २०२६ मधील आरसीबीचा शेवटचा सामना शनिवारी बंगळूरमधील त्यांच्या घरच्या मैदानावर, एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झाला होता, ज्यात डावाची सुरुवात करताना कोहली १३ चेंडूंमध्ये केवळ १९ धावाच करू शकला होता. आता, त्याच मैदानावर शुक्रवारी गुजरात टायटन्सविरुद्ध होणाऱ्या त्यांच्या पुढील सामन्यापूर्वी, विराट कोहली भक्तीमध्ये मग्न असलेला दिसला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande