केरळमध्ये फटाक्यांच्या गोदामाला आग; 13 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
त्रिशूर, 21 एप्रिल (हिं.स.) : केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील वडक्कनचेरी नगरपालिकेअंतर्गत मुंडाथिकोड गावात मंगळवारी फटाक्यांच्या गोदामात भीषण आग लागली. या घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन
केरळच्या त्रिशूरमधील फटाक्यांच्या कारखान्याचे छायाचित्र


त्रिशूर, 21 एप्रिल (हिं.स.) : केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील वडक्कनचेरी नगरपालिकेअंतर्गत मुंडाथिकोड गावात मंगळवारी फटाक्यांच्या गोदामात भीषण आग लागली. या घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.

केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (केएसडीएमए) माहितीनुसार, यात 13 जणांचा मृत्यू झाला असून घटनास्थळाहून 10 मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तर अनेक लोक जखमी झाले असून त्यापैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींवर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून दोघांना सामान्य वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर 17 जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. ही दुर्घटना त्रिशूर जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज पोलिस हद्दीतील थलप्पिल्ली तालुक्यातील मुंडाथिकोड गावात घडली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की हे आकडे प्राथमिक असून बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा व जखमींचा आकडा बदलू शकतो.दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथकांकडून मदत व बचावकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक, मदत जाहीर

केरळच्या त्रिशूरमधील घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर जखमींना 50 हजार रुपयांची अनुग्रह रक्कम दिली जाणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवर (एक्स) दिली आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande