‘ॲक्सिस ट्रस्टी’कडून ‘प्रिझम’ प्लॅटफॉर्म सादर; ट्रस्टी सेवांना तंत्रज्ञानाची नवी गती
मुंबई, 22 एप्रिल, (हिं.स.)। ॲक्सिस ट्रस्टी सर्व्हिसेस लिमिटेड (एटीएसएल) ही ॲक्सिस बँकेची पूर्ण मालकीची उपकंपनी असून, ट्रस्टी सेवा देणाऱ्या आघाडीच्या संस्थांपैकी एक आहे. या कंपनीने ‘प्रिझम’ नावाचा डिजिटल-आधारित प्लॅटफॉर्म सादर केला आहे. या प्लॅटफॉर
मुंबई


मुंबई, 22 एप्रिल, (हिं.स.)। ॲक्सिस ट्रस्टी सर्व्हिसेस लिमिटेड (एटीएसएल) ही ॲक्सिस बँकेची पूर्ण मालकीची उपकंपनी असून, ट्रस्टी सेवा देणाऱ्या आघाडीच्या संस्थांपैकी एक आहे. या कंपनीने ‘प्रिझम’ नावाचा डिजिटल-आधारित प्लॅटफॉर्म सादर केला आहे. या प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकांशी संवाद अधिक सोपा होणार असून सेवा देण्याची प्रक्रिया जलद आणि सुलभ होईल. फिनटेक-आधारित ट्रस्टी बनण्याच्या दिशेने ‘ॲक्सिस ट्रस्टी’ने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

या प्लॅटफॉर्मचे औपचारिक सादरीकरण ॲक्सिस बॅंकेचे एमडी व सीईओ अमिताभ चौधरी यांनी केले. या प्रसंगी ॲक्सिस ट्रस्टी सर्व्हिसेस लिमिटेडचे एमडी व सीईओ राहुल चौधरी उपस्थित होते. या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने ॲक्सिस समूहाचा डिजिटल नवकल्पना आणि परिवर्तनाला चालना देण्याचा भर अधोरेखित झाला.

‘प्रिझम’चे सादरीकरण हे सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) या संस्थेच्या ‘इझ ऑफ डुईंग बिझनेस’ (ईओडीबी) या उपक्रमाशी सुसंगत आहे. प्रक्रिया सोप्या करणे, पारदर्शकता वाढवणे आणि बाजारातील व्यवहार अधिक जलद व कार्यक्षम करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ‘प्रिझम’च्या माध्यमातून ग्राहकांशी संबंधित महत्त्वाच्या प्रक्रिया डिजिटल करण्यात येत असून ट्रस्टी सेवा देण्याची कामकाज पद्धत व नियमपालन त्यामुळे अधिक सोपे व कार्यक्षम होणार आहे.

अधिक सोपा, जलद आणि पारदर्शक अनुभव देण्यासाठी प्रिझम हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. ग्राहकांशी संबंधित महत्त्वाच्या टप्प्यांवर तंत्रज्ञानाचा वापर झाल्याने या प्लॅटफॉर्ममुळे काम पूर्ण होण्यास लागणारा वेळ कमी होईल, प्रतिसाद अधिक जलद मिळेल, तसेच कामकाजाची कार्यक्षमता आणि नियमांचे पालन अधिक सुधारेल, अशी अपेक्षा आहे.

‘प्रिझम’च्या सादरीकरणावेळी बोलताना ‘ॲक्सिस ट्रस्टी सर्व्हिसेस लिमिटेड’चे एमडी व सीईओ राहुल चौधरी म्हणाले, “डिजिटल-आधारित दृष्टिकोनातून ट्रस्टी सेवांकडे नव्याने पाहण्याच्या आमच्या प्रवासातील प्रिझम हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आर्थिक बाजारपेठ वेगाने बदलत असताना ट्रस्टीची भूमिका केवळ देखरेखीपुरती मर्यादित न राहता, ग्राहकांशी अधिक जोडलेली राहणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने माहितीआधारित भागीदार म्हणून ट्रस्टींची भूमिका विस्तारत आहे.

‘प्रिझम’च्या माध्यमातून सर्व संबंधितांसाठी संवाद अधिक सोपा करणे, पारदर्शकता वाढवणे आणि सेवा देण्याची प्रक्रिया अधिक सुरळीत व कार्यक्षम करणे हा आमचा उद्देश आहे. ग्राहकांचा अनुभव सुधारताना कामकाजाची परिणामकारकता वाढवण्याच्या दिशेने हा प्लॅटफॉर्म म्हणजे एक पुढचे पाऊल आहे.

‘ॲक्सिस ट्रस्टी सर्व्हिसेस’मध्ये आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि प्रगत विश्लेषण यांसारख्या नव्या तंत्रज्ञानाच्या शक्यता सातत्याने तपासत आहोत. यामुळे जोखमींचे निरीक्षण अधिक चांगल्या प्रकारे करता येईल, तसेच अधिक योग्य निर्णय घेणे आणि नियमपालन व सुशासनाची चौकट अधिक बळकट करणे हेही शक्य होईल. नियामक संस्थांच्या बदलत्या अपेक्षांपेक्षाही पुढे राहण्यास आम्ही बांधील आहोत. त्या अनुषंगाने प्रिझम सादर करण्यात आला आहे. विश्वास आणि जबाबदारीची उच्च मानके जपणारी, भविष्यासाठी सज्ज ट्रस्टी संस्था उभारण्याच्या आमच्या उद्दिष्टाला यातून बळ मिळेल.”

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande