बीड - गेवराईतील बिअर बारवर धाड; मालकावर गुन्हा दाखल
बीड, 22 एप्रिल, (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील गेवराई येथील पाचेगाव रोडवरील बिअर बारवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने धाड टाकून तीन अल्पवयीन बालकामगारांची सुटका केली आहे. पोलीस पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्याती
बीड - गेवराईतील बिअर बारवर धाड; मालकावर गुन्हा दाखल


बीड, 22 एप्रिल, (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील गेवराई येथील पाचेगाव रोडवरील बिअर बारवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने धाड टाकून तीन अल्पवयीन बालकामगारांची सुटका केली आहे. पोलीस पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील १४ ते १५ वर्षे वयोगटातील तीन मुले वेटरचे काम करताना सापडले. बार मालक आणि मॅनेजर यांनी या मुलांना असुरक्षित ठिकाणी कामाला लावून त्यांची पिळवणूक केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी मिरा महादेव रेडेकर यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात बालकामगार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल व्यवसायासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलली असून पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande