भारतीय तेलवाहू जहाज ‘देश गरिमा’ची होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडून भारतात प्रवेश
मुंबई, 22 एप्रिल (हिं.स.)।भारतीय तेलवाहू जहाज ‘देश गरिमा’ ने स्ट्रेट ऑफ होर्मुझ पार करून भारतात सुरक्षित आगमन केले आहे. देश गरिमा हे कच्चे तेल वाहून नेणारे टँकर मोठ्या प्रमाणात तेल घेऊन भारतात पोहोचले असले, तरी सध्या ते समुद्रात नांगर टाकून उभे आहे
भारतीय तेलवाहू जहाज ‘देश गरिमा’ची होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडून भारतात प्रवेश


मुंबई, 22 एप्रिल (हिं.स.)।भारतीय तेलवाहू जहाज ‘देश गरिमा’ ने स्ट्रेट ऑफ होर्मुझ पार करून भारतात सुरक्षित आगमन केले आहे. देश गरिमा हे कच्चे तेल वाहून नेणारे टँकर मोठ्या प्रमाणात तेल घेऊन भारतात पोहोचले असले, तरी सध्या ते समुद्रात नांगर टाकून उभे आहे. हे जहाज सध्या मुंबई किनाऱ्यापासून काही नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात आहे.

१८ एप्रिल रोजी हे जहाज होर्मुझमधून रवाना झाले होते. भारतीय ध्वज असलेले हे टँकर आयआरजीसीच्या गोळीबारानंतरही पुढे सरकत राहिले आणि अखेर सुरक्षित भारतात पोहोचले. माहितीनुसार, या जहाजावर ३१ भारतीय खलाशी आहेत. जहाज सुरक्षित पोहोचल्याने इंधन तुटवड्याच्या संकटातून मोठा दिलासा मिळणार आहे.

मार्चपासून आखाती देशांमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मुझ पार करणारे देश गरिमा हे दहावे भारतीय जहाज ठरले आहे. व्यापारी जहाजे आणि खलाशांच्या सुरक्षेबाबत भारताने आपली भूमिका स्पष्ट केली असून, इराणकडे स्ट्रेट ऑफ होर्मुझ मार्गे भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याची मागणी करण्यात आली आहे. युद्धजन्य परिस्थिती आणि तेल संकटातून सावरण्यासाठी इराणने यापूर्वीही भारताला सहकार्य केले आहे. भारत आणि इराण यांच्यातील संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत.

यापूर्वी व्हीएलसीसी सन्मार हेराल्ड आणि बल्क कॅरिअर जग अर्णव या दोन भारतीय जहाजांवर स्ट्रेट ऑफ होर्मुझ पार करताना आयआरजीसीकडून गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही जहाजांना माघारी फिरावे लागले होते. या घटनेवर भारताने तीव्र आक्षेप नोंदवला होता. मात्र, जहाजावरील कर्मचाऱ्यांना कोणतीही दुखापत झाली नव्हती.२८ फेब्रुवारी रोजी इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या संघर्षाच्या काळात, कोणत्याही भारतीय जहाजावर इराणच्या सुरक्षा दलांनी हल्ला केल्याची ती पहिलीच घटना होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande