जळगावात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ७ मोटरसायकली जप्त
जळगाव, 22 एप्रिल (हिं.स.)भुसावळ शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालत बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने मोठी कारवाई करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यात
जळगावात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ७ मोटरसायकली जप्त


जळगाव, 22 एप्रिल (हिं.स.)भुसावळ शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालत बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने मोठी कारवाई करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातूनएकूण ७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे ४ लाख ६५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भुसावळ शहरातील तापी नगर येथील रहिवासी आशीष विनायक झोपे (वय ३६) यांची होंडा शाईन मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार २२ एप्रिल २०२३ रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता.

याबाबत पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळालेल्या माहितीनुसार डी.बी. पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान रविंद्र विठ्ठल भदाणे (वय २९, रा. मोहाडी, ता. जामनेर) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदार गजानन अशोक कोळी (वय २७, रा. कोळीवाडा नेरी दिगर, ता. जामनेर) यांच्या मदतीने मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली. सखोल चौकशीत आरोपींकडून विविध ठिकाणांहून चोरी करण्यात आलेल्या ७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये होंडा शाईन, बजाज पल्सर (१२५, १३५, १५०) आणि सुझुकी बर्गमन यांसारख्या वाहनांचा समावेश आहे. या प्रकरणांबाबत भुसावळ, जामनेर, जळगाव एमआयडीसी आणि नांदुरा पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचेही उघड झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande