निवडणूक आयोगाकडून मल्लिकार्जुन खर्गे यांना नोटीस
पंतप्रधान मोदींना ‘दहशतवादी’ संबोधल्याचे प्रकरण नवी दिल्ली, 22 एप्रिल (हिं.स.) : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. खर्गे यांनी पंतप्रधानांना आतंकवादी म्हंटले होते. या आक्षेपार्ह विधानावर 24 तासात स्पष्ट
मल्लिकार्जुन खर्गे


पंतप्रधान मोदींना ‘दहशतवादी’ संबोधल्याचे प्रकरण

नवी दिल्ली, 22 एप्रिल (हिं.स.) : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. खर्गे यांनी पंतप्रधानांना आतंकवादी म्हंटले होते. या आक्षेपार्ह विधानावर 24 तासात स्पष्टीकरण द्यावे असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

तामिळनाडूच्या चेन्नईत 21 एप्रिल रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख आतंकवादी असा केला होता. त्यांच्या या बेताल विधानावरून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, खर्गे यांनी नंतर स्पष्टीकरण देताना सांगितले की, त्यांचा उद्देश पंतप्रधान मोदी लोकांना आणि राजकीय पक्षांना घाबरवतात, असा होता. त्यांनी प्रत्यक्षात मोदींना ‘दहशतवादी’ म्हंटले नसल्याचेही स्पष्ट केले. भाजपने निवडणूक आयोगाकडे खर्गे यांनी या वक्तव्याबद्दल सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणी केली आहे. तसेच भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमान्वये त्यांच्या विरोधात योग्य कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षांचे वक्तव्य केवळ अपमानास्पद नसून, ते लोकशाही संस्थांवर गंभीर आणि अभूतपूर्व हल्ला आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण, किरेन रिजिजू, अर्जुन राम मेघवाल तसेच भाजपच्या इतर नेत्यांच्या प्रतिनिधीमंडळाने निवडणूक आयोगाकडे या प्रकरणाची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर आयोगाने खर्गे यांना नोटीस बजावत 24 तासात स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande